Mutual-fund.co.in
                     Home  |   Mutual Funds Mahiti  |   Top Funds  |   Contact Us  |  
                    

म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात ३२ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. आपल्या पैशानी मोठ काम कराव आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात. तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य NAV जाहीर केले जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकिचे फायदे
म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केट ट्रेड्स व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबंधित स्कीमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबंधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तसं तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये नुकसान सोसत असताना म्युच्युअल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दीर्घ मुदतीत मोठा लाभ मिळवीत असतात.
कमी जोखीम म्युच्युअल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यांतील थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतविली जात असते जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीची जोखीम कमी होते.

म्युच्युअल फंडचे विविध प्रकार

म्युच्युअल फंडाच्या वेगवेळ्या स्कीम्स मध्ये आपण गुंतवणूक करू शकता. एकदाका आपणाला स्कीम्सचे प्रकार समजले की आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्टांनुसार, तुमच्या आवश्यकता, आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा यानुसार स्कीमांची निवड करणे सोपं जातं. संरचना आधारित स्कीम तीन प्रकारच्या असतात.

प्रथमतः तुम्ही स्वतःलाच खालील प्रश्न विचारा व त्यांची प्रामाणिक उत्तरे द्या

माझ्या वयात मी किती रुपयांची गुंतवणूक करावी? मी किती जोखीम पत्करू शकतो? दिर्घकाळीन फायद्यासाठी अल्पकालीन नुकसान झाले तर मी विचलित तर होणार नाही ना? मला किती काळानंतर गुंतवलेली रक्कम परत हवी? मला तत्काळ पैसे काढावे तर लागणार नाहीत ना? मी माझे पैसे किती काळ गुंतवून ठेवू शकतो? मला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे का?

आता पुढील टप्पे पार पाडा

म्युच्युअल फंड कंपनीची निवड करा

म्युच्युअल फंड कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही कंपनीचे नांव ऐकले आहे काय? त्याने मागील काही वर्षात योजनेच व्यवस्थापन कसे केले आहे? योजनेची कामगिरी समान उद्दिष्टाचे योजनेच्या तुलनेत कशी आहे? सेवा कशी दिली जाते? कामकाजात पारदर्शकता आहे का? फंड वारंवार आणि योग्यप्रकारे कामगिरी जाहीर करतो काय? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक मिळाली तर त्या फंडाची निवड करावयास हरकत नाही.

मागील कामगिरी तपासा

ज्या योजनेला किमान ५ वर्ष झाली आहेत व जी सतत मार्केट पेक्षा जास्त परतावा देत असेल तरच तिची निवड करा.म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मागील कामगिरी हाच सर्वा महत्त्वाचा निकष असतो. आमचेशी फोन, व्हिडिओ कॉन्फ़रन्स, प्रत्यक्ष भेट अथवा ईमेल द्वारे संपर्क साधा.

म्युच्युअल फंड गुंतवणूकीद्वारा दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण होवू शकेल याची कारणेः

  • भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
  • परकीय गुंतवणूकदार नियमितपणे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करितं आहेत.
  • अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतील.
  • येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
  • सर्वच विभागात उद्योग धंद्यांना पोषक वातावरण आहे.
  • जीडिपी स्थिर आहे व पुढे वाढ अपेक्षीत आहे.
  • काम करणा-या भारतीयाचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
  • सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे ३ टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
  • उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
  • शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
  • अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत.
  • भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
  • भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.

गुजराथी समाजाने शेअर बाजार व म्युच्युअल फंडाचे माध्यमातून भरपूर संपत्ती निर्माण केली आहे आपण मराठी माणसानेच का मागे राहावे.

शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते जसे की २००४ ते २००७ जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळाला. पण किती जणांनी तो खिशात घातला? फारच थोड्यांनी. कारण आपण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही.उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो.आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातलं बरंच काही कळत. पण खरंच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.(आणि ज्यांना खरंच शेअर बाजारातील कळतं त्यांचेसाठी या साईटची गरजच नाही).आपल्याकडे पुरेसे रिसर्च नसते. मार्केट टायमिंग बरेच वेळा चुकत. अशी अनेक कारण असतात आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त जणांना नुकसानच होते.

डे-ट्रेडिंग - नकोरे बाबा - खरं म्हणजे अजिबात करू नये. तो एक जुगारच आहे. आणि जुगारात किती जणांना बरं पैसे मिळाले आहेत. मी तर वरील सर्व गोष्टी करून बसलो आहे. भरपूर नुकसान सोसले. शेवटी म्युच्युअल फंडच आपल्यासारख्या सामान्य लोकांना फार चांगला.  ज्यांनी एका चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत ग्रोथ ऑप्शनमध्ये डिसेंबर १९९५ पासून दरमहा रुपये एक हजार मात्र गुंतवले आहेत आज त्याची व्हॅल्यू आहे २३ लाख रुपये.

एक मात्र लक्षात ठेवा म्युच्युअल फंडाचे समभाग संबधीत योजनेत पैसे गुंवताना दीर्घ काळासाठीच गुंतवणूक करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होवू शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्यायनिवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे.

मात्र जर आपणाला अल्प काळासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर म्युच्युअल फंडाचे कर्ज रोख्यांचे योजनेत (डेट फंड) गुंतवणूक करा.  यात अगदी २ दिवसापासून ते दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी या योजनेत फक्त व्याज दराची व पत बदलाची जोखिम असल्यामुळे ती अत्यल्प असते.




Developed By Homepages.co.in